शेवटी स्वेच्छा निवृत्ती मंजूर केली

*पोलीस खात्यात 20 वर्षे नोकरी पूर्ण केल्यानंतर पोलिस हवालदार स्वेच्छा निवृत्ती (V.R.S) मंजुर करण्याकरिता डीसीपी यांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर डिसीपीने पोलिस हवालादर यांचे बराच वेळ मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला , शेवटी स्वेच्छा निवृत्ती मंजूर केली.*
         
*पण न राहून शेवटी एक प्रश्न विचारला "सर्व काही मिळत होते या नोकरीमुळे, तरी सुध्दा नोकरी का सोडत आहे तुम्ही ?"*

*त्यावर पोलीस हवालदार याने सुंदर हृदयस्पर्शी व मार्मिक उत्तर दिले.*

*"सर बऱ्याच वेळा पासून तुमच्या समोरील खुर्च्या खाली असून देखील मी गेल्या दोन तासापासून मी सावधान मध्ये उभा आहे. पण तुम्ही साधे माणुसकी सुद्धा तुम्ही दाखवत नाही आणि बसायला पण सांगत नाही आणि हे अमानुष पणाचे वागणे आता मला सहन होत नाही, कारण वीस वर्षा पूर्वी जी ताकत माझ्या मध्ये सहनशीलतेची होती, ती आता संपलेली आहे पण तुमच्या पदामधील इंग्रज अधिकाऱ्याची वृत्ती अजून काही बदलली नाही"*

*बस एवढेच कारण आहे नोकरी सोडण्याचे "*
*(हे पोलीस दलातील एक प्रतिकात्मक उदाहरण आहे अमानुषपणाचे आणि शिस्तीच्या नावाखाली समोरच्याला माणूस न मानण्याचे)*

*हे एक पोलिस दलातील बोलके उदाहरण असले तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात देखील थोड्याफार फरकाने दुर्दैवाने हिच परिस्थिती आहे. साक्षात देवाने पृथ्वीतलावर  सर्व कामगार, कर्मचारी तसेच आपल्या अधिनस्थ शासकीय सेवा बजावणारे यांचेवर अधिराज्य गाजवण्यासाठीच आपल्याला पाठवले असल्याची भावना अधिकारी वर्गात निर्माण झालेली आहे. कर्मचारी वर्गावर अन्याय, तुच्छतेची वागणूक देण्यासाठीच शासनाने आपली नेमणूक केली असल्याची कांही सन्माननीय अपवाद वगळता नोकरशाह व अधिकारी वर्गाची भावना झालेली आहे* .

 

Comments

  1. खूपच छान आहे वाचल्यावर असे लक्षात आले कि अधिकार्यानी खालच्या कर्मचाऱ्याचा आदर केला पाहिजे नाहीतर वरच्या पदावर राहून त्या खुडची स्वताला रिस्पेक्ट न दिल्या ची भावना व्यक्त होते मान सन्मान देत एकमेकांचा आदर केला पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण आपले मत खूपच मोजक्या शब्दात खूपच मोलाचं बोलून व्यक्त केलात
      धन्यवाद

      Delete

Post a Comment

Popular Posts