पुणे मुंबई प्रवास
माझ्या जॉब मुळे 2011 ला पुणे येथे काही महिने होतो त्यावेळेस माझे मुंबई पुणे नियमित प्रवास होत असे तसा मी पुण्यात कधी एकट्याने प्रवास या मार्गाने कधीच केला नाही, हा या मार्गे ट्रेन ने सोलापूर ला गेलो होतो ते पण कॉलेज मध्ये असताना त्यावेळी आमचा ग्रुप होता सोबत सर हि होते पण पुणे येथे थांबणे किंवा ट्रेन मधून उतरलो नाही.
आता जॉब मुळे एकट्याने प्रवास करणे गरजेचं होते.
या शहरांत नवीन असल्याने एक अनोळखी भीती असायची, अनोळखी शहर ठिकाण ती ट्राफिक पण
कधी ट्रेन तर कधी बाय रोड असा प्रवास असायचा,
यावेळी मी ट्रेन चा मार्ग निवडला कारण त्या वेळी बिकानेर फास्ट एक्सप्रेस होती शिवाय ट्रेन चा प्रवास हि स्वस्त. मोठं जंक्शन ते त्याला चहू बाजूने पाहत होतो, ठिकाण ओळखत होतो परत आलो तर कळावे म्हणुन, पण इतक्या तिकडे एक वेगळं काही म्हणुन एक मुलगी पैसे मागत होती. असेल ती 10-13 वर्षाची सर्वाना कडे हात पसरवत होती मला खुप खराब वाटले की काय आपल्या देशाची हि परिस्थिती पण यात हि नवल म्हणजे ती सतत तिच्या ओडनी चा वास घेत होती, का बर ती अशी करते म्हणुन काही वेळ निरीक्षण केल तर दिसलं की ती कोरोस कंपनी चे व्हाईटनर चे रिमूव्हर लिक्विड होते. ती त्या लिक्विड ला तिच्या ओडनीला लावून त्या लीक्विड चा वास घेत होती. ती असं का करते तर खुप काळानंतर समजले की काही लोकांना याच नशा करणे आवडते अशीच नशा पेट्रोल, थिंनेर, फटाके ची दारू याचा वास घेण्याने येत असतें शिवाय हि नशा स्वस्तात हि पडते पण याचा वाईट परिणाम हा आपल्या शरीरावर हि तितकाच भयानक असतें याची कुठलीच कल्पना यांना नसावी.
थोड्या वेळेने मुंबई ची ट्रेन आली जनरल डब्यात चढलो थोडा वेळ बसलो पण पुणे मुंबई ट्रेन रूट वरील निसर्गाचे दृश्य बघण्यासारखे आहेत, ते डोंगर दऱ्या, भोगदे हे पाहणे साठी दरवाज्या कडे आलो तिकडे बाजूला एक गरीब बाई आपल्या लहान एक दीड वर्षच्या मुलाला मांडीवर घेऊन बसली होती. तिच्या सोबत आणखी एक दोन बाया होत्या चर्चा सुरु होती त्यांची अधून मधून मुलगा भूक लागली म्हणुन रडत होता, शांत करूनही शांत होत नाही म्हणुन तिच्या आई ने तीच्या तोंडातील गुटखा सुपारी काढून त्याला खायला दिली गजब वाटले की आई भूक मिटविण्यासाठी मुलाला गुटखा सुपारी देते आणि तो मुलगा हि आनंदाने खात शांत बसला.
आज आपला देश आणि त्यातील जनता हि अशी नशेच्या आहारी जात आहे. आजही वाईट आणि खंत इतकेच वाटते की मी ते फक्त बगत होतो.
Comments
Post a Comment