जे आहे ते सत्य आहे
*वाचा *
कधीही शाळेत न गेलेले छत्रपति
स्वराज निर्माण करतात.
जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक' नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो.
पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचेसाम्राज्य उभे करतात.
कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यंत जाता
रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'जगाला प्रेम शिकवतात.
कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात.
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जगनिर्माण करतात"
मग, आम्ही का नाही?
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,परंतु , तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.कोणाचा अपमानही करू नका आणि कोणाला कमी लेखु नका.
तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.
कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.
*हे मानवा कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल*.
*लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात*.
*याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात*.
*लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत*.💐🙏🏻
व्हाट्सअप लेख
Comments
Post a Comment