आजपासून आत्तापासूनच या गोष्टी सोडून द्या

 *आजपासून आत्तापासूनच या गोष्टी सोडून द्या* 🔥


• तुम्हाला नक्की काय हवंय, नक्की काय करायचंय हे न ओळखता, न ठरवता फक्त समोर येईल ते काम करत राहणं.


• महत्त्वाची कामे करण्यात विनाकारण टाळाटाळ करणे, कारणे देणे.


• स्वतःची कामे दुसऱ्यावर ढकलण्याची सवय.


• समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडवण्याऐवजी इतर कारणे देत बसणे.


• आपल्या चुकांसाठी दुसऱ्याला दोष देण्याची सवय.


• निर्णय घेण्यात खूप उशीर करणे.


• अपयश समोर दिसताच प्रयत्न सोडून देणे.


• सुव्यवस्थित योजना न करणे.


• कल्पना आल्यावर त्यांना दुर्लक्षित करण्याची सवय.


• दृढ इच्छा न करता केवळ कल्पना करत राहणे.


• काही होणे, काही करणे, काही कमवण्याच्या महत्त्वाकांक्षेचा अभाव.


• झटपट काही मिळविण्याच्या उद्देशाने चुकीच्या मार्गांचा अवलंब करणे.


• लोक काय विचार करतील, लोक काय म्हणतील याची भीती.


• दुसऱ्याला नशीबवान समजणं आणि आपल्या नशिबाला दोष देत बसणं.

Comments

Popular Posts