जगण्याचे महत्व कळेल !

फेकून द्या पाण्यात 
मग जगण्याचे महत्व कळेल !
*
एक माणूस त्याच्याकडे असलेल्या डुकरासकट एका बोटीतून प्रवास करत होता.

त्या बोटीत इतर प्रवाशांबरोबरच, एक तत्त्वचिंतकही प्रवास करत होता.

डुकराने आधी कधीच बोटीतून प्रवास केला नसल्याने ते अस्वस्थ होतं. सारखं वर-खाली जात होतं. त्याचा सगळ्यांनाच त्रास होत होता.

नावाड्याला भीती वाटत होती की या सगळ्या गोंधळामुळे बोट बुडेल की काय. जर डुक्कर शांत झालं नाही तर बोट बुडायची. ज्याचं ते  डुक्कर होतं तो माणूसही अस्वस्थ होता, पण काही करू शकत नव्हता.

तत्त्वचिंतक हे सगळं निरखीत होता. त्याने मदत करायचं ठरवलं.

तो त्या माणसाला म्हणाला, "तुमची परवानगी असेल, तर मी या डुकराला एकदम गरीब मांजरी सारखं बनवू शकतो".
त्या माणसानं लागेच "हो" म्हटलं.
मग त्या तत्त्वचिंतकाने दोन सहप्रवाशांच्या मदतीने डुकराला उचललं आणि पाण्यात फेकलं.

डुक्कर जीवाच्या आकांताने पोहायला लागलं.

थोडया वेळाने त्या तत्वचिंतकाने डुकराला पुन्हा बोटीत ओढून घेतलं. त्यानंतर ते डुक्कर अगदी शांत, बोटीच्या एका कोपऱ्यात बसून राहिलं.

डुकराचा मालक आणि इतर प्रवासी हा बदल बघून अवाक झाले. मालकाने तत्त्वचिंतकाला विचारलं, "आधी हे इतकं गोंधळ माजवत होतं, आणि आता भीगी बिल्ली सारखं पडून आहे. हे कसं काय?".

तत्त्वचिंतक म्हणाला, "दुसऱ्याचं दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कोणाला कळत नाही. मी जेव्हा या डुकराला पाण्यात फेकलं, तेव्हा त्याला पाण्यात असलेल्या धोक्यांची जाणीव झाली आणि बोटीचं महत्त्व कळलं".

 आज तुमच्या भोवती पण अशा वृत्तीची अनेक माणसे दिसतील. त्यातली काही अगदी जवळची सुद्धा असतील. आणि जवळच्या लोकांच्या "डुक्कर छाप" वागण्याचा तुम्हाला जास्त त्रास होत असतो. त्यामुळे कधीतरी त्यांना असेच पाण्यात फेकून पहा. म्हणजे शब्दशः नव्हे मात्र वैचारिक पद्धतीने ! की आता जसे आहात (बोटीमध्ये) ते जास्त चांगले आहे, याची जाणीव करून द्या. अन्यथा "वेगळा" काही विचार केला तर तुमचाच जीव (म्हणजे जगणे) संकटात येऊ शकत, हे दाखवून द्या. 
कदाचित हा उपाय जास्त काम करून जाईल !
बाकी सर्वाना छान जगण्यासाठी शुभेच्छा आहेतच !

Comments

Popular Posts